Moshi : मोशी येथे तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – आई-वडिलांना शिवीगाळ केली म्हणून तिघांनी लोखंडी रॉडने तरुणाला बेदम मारहाण (Moshi ) केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.17) मोशी येथे घडला.

Maharashtra : वर्षभरात पूर्ण होऊ शकणारे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावा

याप्रकऱणी अमोल शरद राजगुरु (वय 35 रा. मोशी) यांनी शुक्रवारी (दि.18) फिर्याद दिली आहे. त्यावरून यश प्रदिप पाटोळे (वय 19 रा. मोशी), सचिन सोनवणे (वय 20 रा. चाकण) दशरथ ठाकुर (वय 20) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाने आरोपीच्या आई व वडिलांना शिवीगाळ केली. याचा राग येवून आरोपीने लोखंडी रॉडने तिघांनी फिर्यादीच्या भावाला मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. यावरून भोसरी एमआयडीसी पोलीस याचा तपास करत (Moshi ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.