Akurdi : पत्रकारांनी ट्रोलिंगकडे लक्ष न देता महाराष्ट्र हितावर लिहीत रहावे – राज ठाकरे

एमपीसी न्यूज – पत्रकारितेवरील हल्ले निषेधार्थ आहेत. ट्रोलिंगकडे लक्ष देवू नका, मोबाईलमुळे अनेकजण व्यक्त व्हायला लागले आहेत. राजकीय पक्षांनी लोक पाळले आहेत. त्यावर कशाला प्रतिक्रिया देता. पत्रकारांनी महाराष्ट्र हितावर निर्भीडपणे बोलावे, लिहावे, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड एडिटर्स गिल्ड आयोजित पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषदेत पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील पत्रकारांचा गौरव राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आकुर्डीतील ग.दि. माडगूळकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला  खासदार श्रीरंग बारणे, मनसेचे नेते अनिल शिदोरे, अमित ठाकरे,  माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नाना काटे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, शत्रुघ्न काटे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आदी उपस्थित होते.

आज अनेक पत्रकार वाया गेले आहेत. महत्वाच्या हुद्यावर बसले आहेत. पत्रकार मंत्र्यांकडे कामाला लागले आहेत. पूर्वी लपूनछपून करत होते. आता उघडपणे काम करत आहेत. हे लेबल लावलेले पत्रकार परिषदेत येतात आणि आम्हाला प्रश्न विचारतात. हे काय म्हटला आणि तो काय म्हटला असेच प्रश्न विचारत आहेत. राजकारणाचा स्तर, भाषा बदलली आहे.

Moshi : मोशी येथे तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात. तुम्ही नाही दाखविल्यावर कुठे बोलतील असा सवाल करत ठाकरे म्हणाले, पत्रकारांवरील हल्ले पण आमच्या हल्यावरील काय? महाराष्ट्रातील पत्रकारिता आजही जीवंत आहे. मीही पत्रकारितेत काम केले आहे. मार्मिकमध्ये ब्लॉक लावण्याचे काम केले. तिथपासून ते आतापर्यंतच्या वृत्तपत्राच्या छपाई पर्यंतचा प्रवास पाहिला आहे. पत्रकारिता पाहिली नाही. तर,अनुभवली आहे. पत्रकारितेतून राजकारणात आलो. आताची पत्रकारिता बघत आहे.

अजित पवार सत्तेत गेले याचा पत्रकारांना राग यायला पाहिजे. महाराष्ट्रात काय चालू आहे. सहा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर कोट्यवधी रुपयांचे भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आणि सहा दिवसांनी ते सत्तेत सहभागी होतात. याचा पत्रकारांना राग येत नाही. त्यावर केवळ हसतात आणि सोडुन देतात. हा घरातून निघाला आणि येथे पोहोचला या काय बातम्या आहेत का, निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार अनिल कातळे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.