Hinjawadi : 4 लाखांचे डिझेल चोरणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज : कंपनीमधून 4 लाख रुपयांचे डिझेल चोरणाऱ्या एकाला (Hinjawadi) हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. हि चोरी जुलै 2023 ते 6 ऑगस्ट 2023 या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी विनोद सतीष घाडगे (वय 28 रा.पुनावळे) यांनी शुक्रवारी (दि.18) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी अनंता धोंडीराम घोरपडे (वय 20 रा. ताथवडे) या अटक केली आहे. तर त्याचा साथीदार चालक बालाजी पंडित कांबळे (वय 37 रा. वाकड) याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

Akurdi : पत्रकारांनी ट्रोलिंगकडे लक्ष न देता महाराष्ट्र हितावर लिहीत रहावे – राज ठाकरे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ज्युपीटर आरएसी अँन्ड इन्फ्रा येथून आरोपींनी (Hinjawadi) कंपनीच्या वाहनांसाठी येणारे 4 लाख रुपयांचे 4 हजार 700 लिटर डिझेल चोरून नेले आहे. हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.