Moshi : अश्लील वर्तन करत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – महिलेसमोर अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना लक्ष्मीनगर मोशी येथे घडली.

याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दादासाहेब गुलाबराव बाबळ (वय 39, रा. मोशी, मूळ रा. हिंगणी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबळ फिर्यादी महिलेसमोर येऊन अश्लील हवभाग करून त्यांना त्याच्याकडे येण्याचा इशारा करीत होता. हा प्रकार सप्टेंबर 2018 ते 28 डिसेंबर 2018 असा चार महिने सुरु होता. या त्रासाला कंटाळून महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.