Hinjawadi : धक्का लागला म्हणून तरुणाला बेल्ट व दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – पबमध्ये वॉशरुमला जात असताना एकाला धक्का लागला असता पाच ते सहा जणांनी तरुणाला बेल्ट व दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. हि घटना गुरुवारी (दि.27) मध्यरात्री एफ.एम.एल.पबमध्ये घडली.

याप्रकरणी रमीज आयुब सिकलगार (वय 32 रा.रावेत) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून निखील आवारे व त्याचे प साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : महापालिका हद्दीतील ‘त्या’ गावातील नागरिकांची पायपीट थांबवा – महेश लांडगे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चा भाऊ आयुब सिकलगार, चुलत भाऊ तौफिक मुल्ला असे पब मध्ये गेले होते. यावेळी फिर्यादीचा भाऊ सिकलगार हा वॉशरुमला जात असताना त्याचा एका अनोळखी इसमाला धक्का लागला. यावेळी आरोपी व त्याच्या साथीदारांनी सिकलगार ला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, बेल्टने मारहाण केली.तसेच डोक्यात दगड मारून तौफिक व आयुब यांना मारहाण करत गंभीर जखमी केले यावरून हिंजवडी पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.