Pimpri : महापालिका हद्दीतील ‘त्या’ गावातील नागरिकांची पायपीट थांबवा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काही गावे हवेली भूमि अभिलेख कार्यालयाशी संल्लग्न आहेत. त्यामुळे शासकीय कामासंदर्भात ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.(Pimpri) त्यामुळे आगामी काळात संबंधित गावे पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाशी संल्लग्न करावीत, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे महसूल व दूग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, तहसील हवेली कार्यालयातील काही गावे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील काही गावे यापूर्वी हवेली तहसील कार्यालय अंतर्गत येत होती. मागील काही कालावधीमध्ये सदर गावे अभिलेख सहीत पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्न करण्यात आलेली आहेत.

Vadgaon : आठवडे बाजारातून प्रतिबंधित 30 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

त्याचप्रमाणे भूमी अभिलेख हवेली कार्यालयाअंतर्गत काही गावे पिंपरी-चिंचवड या कार्यालयाशी संलग्न करण्यात यावीत. पिंपरी-चिंचवड मनपातील नागरिकांना जमीन मोजणीकरिता तसेच ‘प्रॉपर्टी कार्ड’ या कामासाठी हवेली भूमिलेख कार्यालयामध्ये जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्चही वाढतो आहे.(Pimpri) त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना शहरातच सुविधा मिळणे सोयीचे होणार आहे.

त्यानुसार, बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चऱ्होली, चोवीसवाडी, डूडूळगाव, मोशी, चिखली, देहु, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे इ. गावे नगर भूमापन अभिलेख पिंपरी-चिंचवड कार्यालयाशी संलग्न करण्यात यावीत, अशी आमची आग्रही मागणी आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे..

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.