Bavdhan : नशेत पोलीस ठाण्यात पोलिसांशीच केली धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या (Bavdhan) पोलिसां सोबत एकाने नशेतच पोलीस ठाण्यात धक्काबुक्की केली. हा प्रकार बावधन पोलीस चौकीत बुधवारी (दि.26) रात्री घडला.

याप्रकऱणी हिंजवडी पोलीस कर्मचारी उदयराज दिपक माने (वय 32) यांनी गुरुवारी (दि.27) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून अमर आबासाहेब दुबल (वय 30 रा.वडगाव) व गोरख नामदेव गाजरे (वय 26) असो दोघांना अटक केली आहे.

Pimpri : महापालिका हद्दीतील ‘त्या’ गावातील नागरिकांची पायपीट थांबवा – महेश लांडगे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडणे सुरु असल्याचा कॉल पोलिसांना आला. त्यानुसार मार्शल घटनास्थळी पोहचले. तेथे कॉल कऱणारा व विरोधक यांच्यात भांडणे सोडविण्यासाठी तक्रार दाखल कऱण्यासाठी पोलिसांनी आरोपीला बावधन पोलीस चौकीत नेले. यावेळी आरोपी अमर याने पोलिसांनी नेशेतच धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. दोन्ही आरोपींनी फिर्यादीशी धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणला व फिर्यादीच्या वर्दीची कॉलर पकडून गणवेशाचे नुकसान केले. आरोपींवर गुन्हा दाखल (Bavdhan) केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.