Bavdhan : अनुसुचीत जातीच्या शेतकऱ्याची जमीन हडपून जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  एका 53 वर्षीय अनुसुचित शेतकऱ्याची जमीन बेकायदेशीररित्या ( Bavdhan) हडपून ती परस्पर भाडेतत्वावर देऊन शेतकऱ्यालाच  धमकी दिली आहे. याप्रकरणी दोघांवर फसवणूक व ॲट्रॉसिटीचा  गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा सारा प्रकार ऑगस्ट 2023 पासून ते आज अखेरपर्यंत बावधन येथे घडत होता.
 
याप्रकरणी पीडित शेतकऱ्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.21) फिर्याद दिली आहे. यावरून बापू ज्ञानोबा दगडे व अनिकेत पुंडलिक दगडे (दोघे राहणार बावधान) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे फिर्शेयादीचीं जमिन आहे. ते व्यवसायाने शेतकरी आहेत,  यावेळी फिर्यादी हे अनुसूचित जातीचे आहेत हे माहिती असताना देखील, तसेच जमीनीच्या 7/12 मध्ये जमीन फिर्यादी व त्यांच्या आईच्या नावावर असताना देखील  आरोपींनी  जमीन परस्पर एका कंपनीला व व्यावसायीकाला ऑनलाईन पद्धतीने भाडेतत्वावर दिली. यावेळी फिर्यादी याबबत विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांना ही जमीन आमची आहे परत इथे दिसलात तर तुम्हाला पाहून घेऊ अशी धमकी दिली, तसेच जागेवरून बेदखल केले. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला ( Bavdhan)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.