Pune : रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी

निष्ठावंतांना संधी दिली नसल्याचा आरोप

एमपीसी न्यूज –  गुरुवारी सायंकाळी काँग्रेसच्या उमेदवारांची राज्यातील  यादी समोर आली आहे. यामध्ये पुण्यामधून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली  . धंगेकर यांचे नाव निश्चित झाल्याचे समजताच काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. निष्ठावंतांना संधी दिली नाही तर त्याचे विपरीत परिणाम घडतील, असा थेट इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी दिला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला आहे.

आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने निष्ठावंतांना संधी द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर निष्ठावंतांना डावलले जात असल्याने शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात याचे पडसाद निश्चित उमटतील, अशी आक्रमक भूमिका आबा बागुल यांनी घेतली आहे.

Wakad : काळाखडक येथील नागरिकांचा एसआरए कार्यालयावर संविधान मोर्चा

पर्वती विधानसभा मतदारसंघातील सर्व ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पक्षश्रेष्ठींनी तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा तटस्थ राहण्याचा इशारा यावेळी पक्षाच्या निरीक्षक आणि अन्य पदाधिकाऱ्यांना दिला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल म्हणाले, विद्यमान आमदाराला तिकीट देवून काँग्रेसने काय साधलं?आमच्यातला शुक्राचार्य कोण शोधा.
काँग्रेस हाऊसमधे शुकशुकाट आहे.  लोकसभा उमेदवारीसाठी आमच्या मुलाखती झाल्या नाहीत असा आरोपदेखील त्यांनी केला. मी कोणाच्याही चपला उचलणार नाही .राहुल गांधी एका बाजूला न्याय यात्रा काढतात मग निष्ठावंतांना न्याय मिळणार की नाही? कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार व लोकशाही मार्गाने काँग्रेभवनवर कँडल मार्च काढणार असल्याचे ते म्हणाले. तसेच राहुल गांधी, खर्गें यांची   भेट घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.