Wakad : काळाखडक येथील नागरिकांचा एसआरए कार्यालयावर संविधान मोर्चा

एमपीसी न्यूज – काळाखडक,वाकड क्षेत्रामधील झोपडपट्टी धारकांचा ( Wakad ) एसआरए योजनेमधील सर्वेक्षणात बोगस नोंदी झाल्या असून अनेक त्रुटी असल्याचा आरोप करत सर्वे रद्द करण्याच्या मागणीसाठी अपना वतन संघटनेने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) पुणे येथील कार्यालयावर संविधान मोर्चा काढला.

अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख म्हणाले की, महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम 1971 नुसार एसआरएची कायदेशीर प्रक्रिया राबवणे अपेक्षित आहे. परंतु, विकसक, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मधील अधिकारी संगनमत करून स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता , लोकांची संमती नसताना त्यांची दिशाभूल करून तिऱ्हाईत व्यक्तींमार्फत संमती भरून घेत आहेत. त्यामुळे काळाखडक येथे झालेला बेकायदेशीर सर्व्हे रद्द करण्यात यावा. यावेळी एसआरएचे मुख्याधिकारी निलेश गटने यांनी निवेदन स्वीकारले.

Junnar : किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक नेताय? वन विभागाने घेतला हा निर्णय

आंदोलनावेळी अपना वतन संघटनेचे कार्याध्यक्ष राजू शेरे , आझाद समाज पार्टीचे अॅड. क्रांती सहाणे, रुपाली कांबळे ,  सचिव दिलीप गायकवाड ,महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , संघटक हमीद शेख , जितेंद्र जुनेजा , प्रकाश पठारे , तौफिक पठाण , अब्दुल अजीज शेख , विशाल गायकवाड , विकास पडागळे , कयूम पठाण , यांसह काळाखडक येथील शेकडो नागरिक ( Wakad ) उपस्थित होते .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.