Junnar : किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक नेताय? वन विभागाने घेतला हा निर्णय

एमपीसी न्यूज –  छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या (Junnar) किल्ले शिवनेरीवर जाणा-या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी आहे. किल्यावरील  जैवविविधता आणि वृक्षराजी अबाधित रहावी या उद्देशातून गुरुवार पासून तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जूनपासून पुढे किल्ल्यावर कायमस्वरूपी प्लास्टिक बंदी लागू करण्यात येणार आहे.

Nigdi : भारतीय संस्कृती मंचतर्फे गुढीपाडवानिमित्त ” मेरे घर राम आए है” संकल्पनेवर आधारीत शोभायात्रेचे आयोजन

किल्ले शिवनेरीवर पाण्याची बाटली वगळता कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक तसेच तंबाखू , गुटखा, बिडी, सिगारेट, काडेपेटी घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात येणार आहे. वाढत्या उन्हामुळे फक्त पाण्याची बाटली किल्ल्यावर घेऊन जाण्यासाठी परवानगी असेल‌. 5 जूनपासून किल्ल्यावर कायमस्वरूपी प्लास्टिक पाण्याची बाटली घेऊन जाण्यासाठी बंदी असेल. वनविभाग जुन्नर आणि पुरातत्व विभागामार्फत येणाऱ्या शिवप्रेमीसाठी फिल्टर स्वरुपातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी उपलब्ध करून देणार आहे.

जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांच्या संकल्पनेतून किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक बंदी राबविण्यात येणार आहे. पर्यटकांनीही हातभार लावून तपासणीसाठी सहकार्य करावे , असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी (Junnar)  प्रदीप चव्हाण यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.