Nigdi : भारतीय संस्कृती मंचतर्फे गुढीपाडवानिमित्त ” मेरे घर राम आए है” संकल्पनेवर आधारीत शोभायात्रेचे आयोजन

एमपीसी न्यूज – भारतीय संस्कृती मंच यमुनानगर यांच्यावतीने (  Nigdi) गुढीपाडवा निमित्त 9 एप्रिल 2024 या दिवशी हिंदू नववर्ष शोभा यात्रेचे आयोजन केले जात आहे. यंदाचे हे 24 वे वर्ष आहे.

दरवर्षीप्रमाणेच सकाळी 7 वाजता गुढीची व ग्रंथदिंडीची पूजा करून शोभायात्रेची सुरुवात श्री अष्टविनायक मंदिर येथून होईल. शोभायात्रेची सांगता श्रीराम मंदिर यमुनानगर येथे होईल.

यावर्षी 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यानिमित्ताने यावर्षी  ” मेरे घर राम आए है” या संकल्पनेवर आधारित शोभायात्रेचे नियोजन करण्यात येत आहे. शोभा यात्रेमध्येश्रीराम रथ,  केरळी वाद्यवृंद, देशातील विविध प्रांतातील नागरिक (राजस्थानी समाज, माहेश्वरी समाज, गुजराती समाज, पंजाबी समाज इ.) दाक्षिणात्य कांतारा वेशभूषेतील कलाकार, महाराष्ट्रातील विविध पारंपरिक वेशातील नागरिक, ढोल ताशा पथक, पौराणिक तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेतील शालेय मुले, महिलांचे लेझीम पथक, धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, विविध मंडळांचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक यांचा सहभाग असेल.

तरी नागरिकांनी या अनोख्या व संस्कृती जपणाऱ्या शोभायात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात (  Nigdi) आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.