Pune : आयसीएमएआयतर्फे गुणवंताचा, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

 एमपीसी न्यूज – दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टर तर्फे (आयसीएआय) गुणवंत ( Pune ) विद्यार्थ्यांचा, तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी टाटा मोटर्स लिमिटेडच्या सप्लाय चैन फायनान्सचे वरिष्ठ महाव्यवस्थापक सीएमए गोपाल भुतडा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीएमए नीरज जोशी, माजी अध्यक्ष सीएमए अमित आपटे, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए नागेश भागणे, उपाध्यक्ष सीएमए नीलेश केकाण, सचिव सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, खजिनदार सीएमए राहुल चिंचोलकर, कोचिंग कमिटी चेअरमन सीएमए हिमांशू दवे, स्टुडंट कॉर्डीनेशन कमिटी चेअरमन सीएमए अमेय टिकले आदी उपस्थित होते. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्सच्या अधिष्ठाता डॉ. अंजली साने यांच्या हस्ते हे सन्मान करण्यात आले.

Chinchwad : ज्येष्ठ पत्रकार मदन जोशी यांचे निधन

डिसेंबर 2023 च्या सीएमए परीक्षेत गुणवत्ता यादीत असलेल्या विद्यार्थ्यांसह वर्षभरात फायनल, इंटरमीडिएट व फाउंडेशनमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 180 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये फायनल 40, इंटरमीडिएट 118 व फाउंडेशनच्या 22 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी विद्यार्थ्यांचा विविध ( Pune ) गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.