Maval : पाण्यासाठी मुक्या जनावरांची भटकंती थांबणार

एमपीसी न्यूज – शिरोता वनपरिक्षेत्रात वन विभागाकडून प्राण्यांसाठी ( Maval ) नैसर्गिक टाक्यांमध्ये पाणी सोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नैसर्गिक टाक्यांमध्ये पाणी आल्याने नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या मुक्या प्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे. या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

 

Charholi :  चोविसावाडीत कचरा संकलन केंद्र करु नका; चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची मागणी

मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. जंगलाचे क्षेत्र मोठे असल्याने या भागात सर्व प्रकारचे प्राणी आढळून येतात. सध्या उन्हाळा वाढत आहे. बहुतांश नैसर्गिक पाणवठ्यांमधील पाणी आटले आहे. सर्व पाणवठे कोरडे पडल्याने जंगली प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे.

प्राण्यांना मुबलक पाणी आणि अन्न मिळाले नाही तर ते त्याच्या शोधात मानवी वस्तीत येतात. तिथे आल्यानंतर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. तसेच वन्य प्राणी आणि मानव असा संघर्ष देखील होतो. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी शिरोता वनपरिक्षेत्रात नैसर्गिक टाक्यांमध्ये पाणी सोडले जात आहे.

अनेक ठिकाणी नैसर्गिक दगडी टाके आहेत. त्यामध्ये पाणी सोडल्यास प्राण्यांना तिथे पाणी पिता येईल. वन विभागाकडून टँकर द्वारे पाणी सोडले जात आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि इतर सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत ( Maval ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.