Junnar : आदिवासी वस्तीवर घराला आग; संपूर्ण संसार जळून खाक

एमपीसी न्यूज – जुन्नर तालुक्यात एका आदिवासी वस्तीवर( Junnar )घराला आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. ही घटना सोमवारी (दि. 19) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.

19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरी येथे शासकीय शिवजान्मोत्सव सोहळा(Junnar )संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर अतिमहत्वाच्या व्यक्ती आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व विभागांनी जुन्नर येथे धाव घेतली होती.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे अग्निशमन विभागाची पथके देखील जुन्नर येथे पाठवण्यात आली होती. शासकीय शिवजान्मोत्सव सोहळा संपन्न झाल्यानंतर अग्निशमन विभागाची पथके माघारी येत असताना जुन्नर जवळ एका घराला आग लागल्याची वर्दी मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्ध्या रस्त्यातून पुणे, पिंपरी-चिंचवड, जुन्नर, खेड, मंचर येथील अग्निशमन पथके जुन्नर पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका आदिवासी वस्तीवर रवाना झाली. दरम्यान स्थानिक नागरिकांनी पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी होजरील आणि पाईपने पाणी मारून आग पूर्णपणे विझवली.

35 हजारांची राख

आग विझवल्यानंतर जवानांनी घराची पाहणी केली असता ढिगाऱ्यात एक पेटी आढळली. त्यामध्ये चलनी नोटा जळाल्याचे आढळून आले. आदिवासी शेतकरी कुटुंबाने पोटाला चिमटा काढून पै-पै जमवून 35 हजार रुपये साठवून ठेवले होते. त्या संपूर्ण 35 हजार रुपयांच्या नोटांची राख झाली.

SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पीएमपी प्रवासात विशेष सुविधा

संपूर्ण घर बेचिराख

आगीमध्ये घराच्या छताची कौले पडली आहेत. तसेच घरातील सर्व वस्तू आणि साहित्य जळून गेले आहे. घरात लग्न समारंभ असल्याने लग्नाचे साहित्य आणले होते. ते देखील जळून खाक झाल्याचे म्हटले जात आहे. घरात सापडलेला सिलेंडर लिक अवस्थेत आढळून आला. घरासमोर असलेली एक इलेक्ट्रिक दुचाकी देखील जळून गेली आहे.

सुदैवाने जीवित हानी नाही

या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग लागण्यापूर्वी घरातील सर्वजण घराला कुलूप लाऊन गेले होते. त्यानंतर ही आगीची घटना घडली. त्यामुळे या कुटुंबाचे दैव बलवत्तर असल्याने त्यांचा जीव वाचला असल्याचे म्हटले जात आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.