Wakad : दुकानासमोर पार्क केलेली सेंट्रो कार चोरीला

एमपीसी न्यूज – दुकानासमोर पार्क केलेली सेंट्रो कार चोरट्याने चोरून नेली. (Wakad) ही घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी एक ते शनिवारी (दि. 15) सकाळी 11 वाजताच्या कालावधीत जोशी वडेवाले या दुकानासमोर काळेवाडी येथे घडली.

भारत भाऊसाहेब मीरपगारे (वय 30, रा. काळेवाडी. मूळ रा. अहमदनगर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Gold-Silver Price in Pune : सलग दुसऱ्या दिवशी सोन 62 हजार पार तर चांदीने गाठला 80 हजाराचा भाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची पन्नास हजार रुपये किमतीची सेंट्रो कार काळेवाडी येथील जोशी वडेवाले या दुकानासमोर पार्क केली. (Wakad) अज्ञात चोरट्यांनी दुकानासमोर कार चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.