Wakad : ऑनलाइन टास्क देण्याच्या बहाण्याने महिलेची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाइन टास्क देण्याच्या बहाण्याने महिलेकडून दोन लाख 12 हजार रुपये घेत महिलेची फसवणूक करण्यात आली.(Wakad) हा प्रकार 12 आणि 13 मार्च रोजी वाकड येथे घडला.

याप्रकरणी 8852015916, टुटर पटेल, टुटर कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने शनिवारी (दि. 15) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wakad : दुकानासमोर पार्क केलेली सेंट्रो कार चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टास्क देण्याच्या बहाण्याने गुंतवणुकीवर चांगल्या पैशांचे आमिष दाखवून आरोपींनी फिर्यादी महिलेकडून दोन लाख 12 हजार रुपये घेतले.(Wakad) पैसे घेतल्यानंतर महिलेला कोणत्याही प्रकारचा मोबदला अथवा त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.