Pune : राज्यात येत्या 15 दिवसात दोन मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता : प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज :  राज्यात येत्या 15 दिवसात दोन राजकीय मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे.त्यामुळे तुम्ही जरा थांबा आणि पहा अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात मांडली. (Pune) शिंदे फडणवीस सरकार विरोधात सुप्रीम कोर्टाचा निर्णय गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजप सोबत जातील. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना आपली भूमिका मांडली


  महाविकास आघाडीकडून राज्यभरात वज्रमूठ सभा आयोजित करण्यात येत आहे.या सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मैत्री सध्या चर्चेत आहे. (Pune) त्यामुळे आगामी कालावधीत शिंदे फडणवीस सरकार विरोधात सुप्रीम कोर्टाचा निर्णय गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजप सोबत जाऊ शकतात. त्यावरून सध्या चर्चा असून त्यावर राष्ट्रवादी किंवा भाजपकडून कोणताही नेता स्पष्टपणे भूमिका मांडताना दिसत नाही. पण आज वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुढील 15 दिवसात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली आहे.त्यामुळे राजकीय क्षेत्रातील एकच खळबळ उडाली आहे.

 

Wakad : ऑनलाइन टास्क देण्याच्या बहाण्याने महिलेची दोन लाखांची फसवणूक

 

राज्यात येत्या 15 दिवसात दोन मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जरा थांबा आणि पहा अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.(Pune) त्यामुळे आता आगामी कालावधीत राज्यात नेमक काय घडते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.