Chinchwad : नोकरीच्या आमिषाने तरुणाची चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तींनी एका तरुणाची तीन लाख 92 हजार रुपयांची फसवणूक केली. (Chinchwad)  हा प्रकार 11 ते 17 मार्च या कालावधीत केशवनगर चिंचवड येथे घडला.

तेजस शिवाजी डावरे (वय 27, रा. केशवनगर चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेलिग्राम क्रमांक धारक 9306323892, व्हाट्सअप क्रमांक धारक 9503995451 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : राज्यात येत्या 15 दिवसात दोन मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता : प्रकाश आंबेडकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी आरोपींनी फिर्यादी यांना सोशल मीडिया वरून संपर्क केला. फिर्यादी यांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले. तसेच वेळोवेळी फिर्यादी कडून ऑनलाईन माध्यमातून पैसे घेतले. (Chinchwad) सहा दिवसांच्या कालावधीत आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून तीन लाख 92 हजार 999 रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना नोकरी न देता तसेच भरलेले पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.