Dhanore : धानोरे येथील मोकळ्या रानातील गवताला आग

एमपीसी न्यूज :  धानोरे फाटा जवळील कैलाश वाहन कंपनी (Dhanore) पासून काही अंतरावरच असलेल्या  (एका प्लॉट लगत) मोकळ्या  रानातील वाळलेल्या गवताला आज दुपारी मोठ्या प्रमाणात आग लागली.

Chinchwad : नोकरीच्या आमिषाने तरुणाची चार लाखांची फसवणूक

या घटनेचे वृत्त शुभम काटे ,अमित घुंडरे यांनी अग्निशमन दलास  दिले. अग्निशमन दलाचे कर्मचारी विलास पवार, अक्षय त्रिभुवन ,पद्माकर शिरामे हे अग्निशमन गाडी सह घटना स्थळी दाखल झाले. (Dhanore)  व तत्काळ त्या आगीवर वाहनातील पाण्याच्या पंपाद्वारे, पाणी मारून  ती आग आटोक्यात आणली.

कैलाश वाहन कंपनी लगत असणाऱ्या कचऱ्याला ही आग लागली होती. ती ही तत्काळ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी विझवली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.