Pune : मुळा-मुठा नदीची गणना देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये

एमपीसी न्यूज : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या  नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे.  पर्यावरण मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीतून देशातील 302 नद्या प्रदूषित असल्याचे आढळून आले आहे. मुळा, मुठा या नद्यांची गणना देखील देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या म्हणून झाली आहे. महाराष्ट्रातील मुळा-मुठा सह 49 नद्या प्रदूषणाने ग्रस्त असल्याचा खुलासा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर दूषित झालेल्या या नद्यांचे शुद्धीकरण तातडीने करण्याची गरज आहे. 

पुणे शहराच्या मध्य भागांतून वाहणाऱ्या मुळा आणि मुठा या नद्यांना प्रदूषणाने ग्रासलेलं आहे. नदी संवर्धन अनेक प्रकल्प गाजावाजा करत आणण्यात आले मात्र प्रत्यक्षात अंलबजावणीच्या नावाने बोंब  आहे. त्यामुळे नद्यांच्या अवस्थेत मात्र काडी मात्र बदल झालेला नाही. हि परिस्तिथी संबंध महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात 49  नद्या प्रदूषित आहेत मुठा, गोदावरी, भीमा, तापी, वैतरणा, पंचगंगा,पैनगंगा, कुंडलिका या मोठ्या नद्यांना प्रदूषणाने घेरलं आहे. ज्या नद्या औद्योगिक परिसरातून वाहतात त्या प्रदूषित होण्याचा प्रश्न महाराष्ट्रात आहेच, शिवाय ज्या नद्या मोठ्या शहरांमधून जातात त्यांचा प्रश्न अलीकडे जास्त गंभीर बनलाय. पुण्याची मुठा, पिंपरी-चिंचवडची पवना, नागपूरची नाग, मुंबई-ठाणे भागातील उल्हास, मिठी, माहीम या नद्यांच्या पुरत्या गटारगंगा झाल्या आहेत. या नद्यांच्या प्रदूषण नियंत्रण करण्याचे आदेश पर्यावरण मंत्रायलयाने संबंधित प्रशासनाला दिले आहेत. मात्र नुसते आदेश न देता याबाबत काही तरी  ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.

नदीची अवस्था 

मुळा-मुठा नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. शेवाळामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलला आहे. नदीकाठचा परिसरातही स्वच्छता करण्याची गरज भासत आहे.  या नद्या मैलापाणी आणि सांडपाण्यामुळेच प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळे नदी परिसरात काही प्रमाणात दुर्गंधी पसरल्यामुळे त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.