Pune : शहरातील वाढत्या वाहनात रिक्षांची भर

 ६६ हजार रिक्षा पुण्याच्या रस्त्यावर 

 शहरात सीएनजी पंपाचे दुर्भिक्ष  

एमपीसी न्यूज – शासनाने १९९७ पासून बंद केलेले रिक्षा परवाने आता सर्वांसाठी खुले केले  आहे. त्यामुळे मागील वर्षभरात २० हजार रिक्षांची भर पडली असून सध्या शहरात ६६ हजार रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. नव्याने दाखल झाल्या रिक्षा ह्या सिएनजी प्रकारातील असून इंधनासठी रिक्षा चालकांना मात्र रंगांमध्ये ताटकळत उभे राहावे लागत आहे. 

1997 पासून शासनाने रिक्षा परवाने देणे बंद केले होते. त्यामुळे दुसर्‍याचा परवान्यावर रिक्षा चालवून शेकडो रिक्षाचालक स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मात्र आता मागेल त्याला परवाना देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. तब्बल 19 वर्षानंतर  परवाने देणे सुरू झाल्याने नव्याने रिक्षाची संख्या शहरात वाढत आहे.१९९७ झाली परवाने देणे बंद केल्यानंतर शहरात ४६ हजार परवानाधारक रिक्षा पुण्याच्या रस्त्यावर धावत होत्या त्यात २० हजार रिक्षांची  मागील वर्षात भर पडली असून आता पुणे शहरातील परवानाधारक रिक्षांची संख्या ६६ हजावर गेली आहे. असे असली तरी मुंबईच्या तुलनेत पुण्यातील रिक्षांची संख्या निम्मी असल्याचे पहिला मिळते. मुंबईत ती १ लाख ३९ हजार इतकी आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरातील सर्वच रिक्षा सीएनजीवर परावर्तित करण्यात आल्या आहेत.

रिक्षांबरोबरच सार्वजनिक प्रवासीसेवेत नव्याने येणाऱ्या सर्व बस सीएनजीवरीलच आहेत. त्याचप्रमाणे अनेक खासगी मोटारीही सीएनजीवर परावर्तित करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. एकीकडे रिक्षांची संख्या वाढत असली तरी त्याप्रमाणात शहरात सीएनजी पंपांची संख्या कमी असल्याने रिक्षा चालकांना तासंतास इंधनासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. याचा परिणाम त्याच्या व्यावसायिकांवर होत आहे. 

देशात सर्वाधिक नवीन वाहने पुण्यात 

सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने दिवसेंदिवस शहरात खाजगी गाड्याची संख्या वाढत चालली आहे. केंद्रीय परिवहन मंत्र्यालयाच्या आकडेवारी नुसार एक जानेवारी २०१७ ते ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधी मध्ये  ८१ लाख ७८ हजार ८२४ नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक वाहन नोंदणी महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रात  २० लाख चार हजार ४८४ वाहनांची नोंदणी झाली. त्यामुळे  पुणे प्रादेशिक कार्यालयात सर्वाधिक दोन लाख २१ हजार ९८० वाहनाची नोंदणी झाली आहे.    

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.