Pune : एनडीए युथ स्पोर्टस क्लब, सिटी एफसी पुणे, संगम यंग बॉईज, दुर्गा एस.ए. उपांत्य फेरीत

एमपीएससी न्यूज  – एनडीए युथ स्पोर्टस क्लब, सिटी एफसी पुणे, (Pune)  संगम यंग बॉईज, दुर्गा एस.ए. संघांनी येथे सुरु असलेल्या अॅस्पायर चषक २०२३ फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. चौघांच्या कामगिरीतील फरक म्हणजे एनडीए आणि सिटी एफसी संघाला विजयासाठी शूट-आऊटपर्यंत झुंजावे लागले. 

पिंपरी येथील डॉ. हेडगेवार मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेत दुर्गा एस.ए. संघाने आक्रमक खेळ करताना राहुल एफ.ए. संघाचा ३-१ असा पराभव केला. नीरज माने आणि नेल्सन पास्ते यांनी पाठोपाठच्या ११ आणि १२व्या मिनिटाला गोल करून दुर्गा संघाला आघाडीवर नेले. पूर्वार्धात राहुल एफ.ए.च्या गणेश पाटीलने २४व्या मिनिटाला गोल करून गोलफरक कमी केला. मात्र, उत्तरार्धात त्यांना आणखी यश आले नाही. त्याऊलट रॉनी रोझारियोने ३६व्या मिनिटाला गोल करून दुर्गा संघाला आघाडीवर नेले. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.

एनडीए युथ स्पोर्ट्स क्लब संघाला नियोजित वेळेतील १-१ अशा बरोबरीनंतर अशोका इलेव्हनवर शूट-आऊटमध्ये ४-३ असा विजय शक्य झाला. नियोजित वेळेत रवी किरणने १२व्या मिनिटाला अशोका इलेव्हनला आघाडीवर नेले होते. त्यांचा आनंद सातच मिनिटे टिकला. सुधीर कुमारने १९व्या मिनिटाला एनडीए संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर अखेरपर्यंत ही गोलबरोबरीची कोंडी सुटू शकली नाही. शूट-आऊटमध्ये एनडीएसाठडी रितेश ठाकूर, अजेश सी.ए., संदीप सिंग, आशिष कोहली यांनी गोल केले. अशोका संघाकडून श्रीराग व्ही. आर., प्रसाद भंडारी, श्रीकांत महाडिक यानांच जाळीचा वेध घेता आला.

सिटी एफसी पुणे (Pune) वि. सांगवी एफसी हा सामनाही शूट-आऊटमध्येच निकाली लागला. नियोजित वेळेत गोलशून्यची बरोबरी अखेरपर्यंत सुटू शकली नाही. शूट-आऊटमध्ये लिलत पाटील, प्रितेश बाबर, सात्विक नायक, व्हिकी सिंग यांनी आपले लक्ष्य अचूक साधले. सांगवी संघाकडून ऋत्विक एम., फाहेद खान, संदन नानेक यांनाच गोल करता आले. सिटी एफसीने सामना ४-३ असा जिंकला.

अखेरच्या उपांत्यपूर्व फेरीत संगम यंग बॉईंज संगाने १३व्या मिनिटाला विपुल गोफाणेने नोंदविलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर संगम यंग बॉईज संघाने पुणेरी (Pune) वॉरियर्सवर १-० असा विजय मिळविला.

निकाल (सर्व उपांत्यपूर्व फेरी), दुर्गा स्पोर्ट्स अकादमी ३ (नीरज माने ११वे, नेल्सन पास्ते १२वे, रॉनी रोझारियो ३६वे मिनिट) वि.वि. राहुल फुटबॉल अकादमी १ (गणेश पाटील (२४वे मिनिट)

Khadkwasla : खडकवासला धरणात बुडणाऱ्या 5 मुलींचे 53 वर्षीय संजय माताळेनी वाचविले प्राण 

एनडीए युथ स्पोर्ट्स क्लब १ (४) (सुधीर कुमार १९वे मिनिट, रितेश ठाकूर, अजेश सी.ए., संदीप सिंग, आशिष कोहली) वि.वि. अशोका इलेव्हन १ (३) (रवी किरंण १२वे मिनिट, श्रीराग व्ही. आर., प्रसाद भंडारी, श्रीकांत महाडिक)

सिटी एफसी पुणे (४) (ललित पाटील, प्रितेश बाबर, सात्विक नायक, विकी सिंग) वि.वि. सांगवी फुटबॉल क्लब ब  (३) (ऋत्विक एम., फाहेद खान, संधान नाणेकर)

संगम यंग बॉईज ब १ (विपुल गोफाणे १३वे मिनिट) वि.वि. पुणेरी वॉरियर्स

Pune : प्रदीप कुरुलकरानंतर हवाई दलातील आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.