Nigdi : घंटागाडी कर्मचा-यांना उबदार जॅकेट्स वाटप

एमपीसी न्यूज – नमस्कार फाऊंडेशन आणि मित्र परिवार सोशल फाऊंडेशनच्या वतीने (Nigdi)समाजासाठी खऱ्या अर्थाने आरोग्यदूत ठरणाऱ्या घंटागाडी कर्मचारी मंडळीना आगामी थंडीच्या मोसमासाठी उबदार जॅकेट्स वाटप करण्यात आले आहेत.

निगडी प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथे आज सकाळी 135 घंटागाडी (Nigdi)कर्मचा-यांना दिवाळीच्या निमित्ताने येत्या हिवाळ्यात थंडीपासून बचाव व्हावा, या हेतूने उबदार जॅकेट्सचे वाटप करण्यात आले.

Pimpri Chinchwad :नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेची निवडणूक बिनविरोध

या मदतीमुळे घंटागाडी कर्मचा-यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. खऱ्या अर्थाने हे कर्मचारी आपल्या असंख्य नागरिकांसाठी आरोग्यदूत ठरतात, कारण ते भल्या पहाटे नित्यनेमाने पालिकेच्या सर्व प्रभागात जमा झालेल्या कचऱ्यांचे वहन करतात. यावेळी महिला कर्मचारीही मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.

यावेळी महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, नमस्कार फाऊंडेशनचे सुहास जोशी, मित्र परिवार सोशल फाऊंडेशनचे अतुल भोंडवे, दिलीप मोरे, सुभाष राणे, संदीप गोरे, लक्ष्मण भणगे, राजेश शिरोळे ,नितीन जाधव,विवेक कुलकर्णी, अमोल भोंडवे, सनदी लेखापाल किशोर जाधव, सामाजिक कार्यकर्ते नितीन अप्पा बारणे, सलिम शिकलगार, आरोग्य निरीक्षक साबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.