Pimpri Chinchwad :नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेची निवडणूक बिनविरोध

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेची (Pimpri Chinchwad)वार्षिक सर्वसाधारण सभा, नाट्य परिषद कार्यालय चिंचवड येथे पार पडली. यावेळी अध्यक्ष भाऊसाहेब भोईर व गिरीश महाजन, (नियामक मंडळ सदस्य, मध्यवर्ती) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा संपन्न झाली.

या सभेत नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे.

Pimpri Gaon : मित्राच्या मदतीने मुलीने केला आईच्या फोनवरून पैशांचा अपहार, आईनेच केली पोलीस ठाण्यात मुलीविरोधात तक्रार

सर्वसाधारण सभेमध्ये पिंपरी चिंचवड शाखेची सन. 2018-23 च्या कार्यकारिणी समिती ची मुदत (Pimpri Chinchwad)संपुष्टात आली असल्याने मध्यवर्ती च्या सुचेननुसार पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारिणी समितीची निवडणूक घेण्याचा ठराव करण्यात आला. या निवडणुकीसाठी मध्यवर्तीकडून गिरीश महाजन यांची निरीक्षक म्हणून नेमणुक करण्यात आली होती. त्यानुसार सर्वसाधारण सभेमध्ये निवडणुकीविषयी चर्चा झाली. मध्यवर्तीच्या शाखा व्यवस्थापन समितीने केलेल्या नियमांची सविस्तर माहिती मध्यवर्तीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि शाखा व्यवस्थापन समिती सदस्य गिरीश महाजन यांनी सभेला दिली.

त्यानंतर 20 जणांनी समिती मध्ये काम करण्यात इच्छा असल्याचे सांगितले. या विषयावर सभेमध्ये साधक बाधक चर्चा करून 17 जणांच्या कार्यकारिणीची बहुमताने निवड करण्यात आली. सभेला मोठ्या संखेने पिंपरी चिंचवड शाखेचे सभासद उपस्थित होते.

 

सन 2023-28 साठी निवडून आलेल्या कार्यकारिणी सदस्यांची नावे

भाऊसाहेब सोपानराव भोईर , नाट्य निर्माते
राजेशकुमार नौपतलाल साकला , निर्माता
कृष्णकुमार किशोरीलाल गोयल, निर्माता
किरण धुंडिराज येवलेकर, रंगकर्मी
सुहास दामोदर जोशी, रंगकर्मी, दिग्दर्शक
राजेंद्र मदनलाल बंग , नेपथ्यकार
संतोष गोपाळ रासने , अभिनेता, दिग्दर्शक
गौरी यशवंत लोंढे , अभिनेत्री, दिग्दर्शक
संतोष रतन शिंदे, दिग्दर्शक, रंगकर्मी
नरेन्द्र दिगंबर आमले, रंगकर्मी
जयराज राम काळे , रंगकर्मी
सुदाम मनोहर परब, रंगकर्मी
हर्षवर्धन भाऊसाहेब भोईर , निर्माता
मनोज डाळिंबकर, रंगकर्मी
मुकेश घोडके, रंगकर्मी
आकाश प्रदीप थिटे , निवेदक
रुपाली आनंद पाथरे, अभिनेत्री
इत्यादींची कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली

तसेच, सल्लागार समिती म्हणून खालील मान्यवरांची नेमणूक करण्यात आली

हेमेंद्रभाई डाह्याभाई शहा
राजेंद्र रामभाऊ गोलांडे
प्रकाश सोपान जगताप

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.