Pimpri Gaon : मित्राच्या मदतीने मुलीने केला आईच्या फोनवरून पैशांचा अपहार, आईनेच केली पोलीस ठाण्यात मुलीविरोधात तक्रार

एमपीसी न्यूज – आईच्या फोनचा गैरवापर करत मुलीनेच (Pimpri Gaon)तिच्या मित्राच्या सहाय्याने पैशांचा अपहार केला आहे. ही घटना शुकवारी (दि.10) पिंपरी गाव येथे घडली आहे.

मुलीचा प्रताप उघडकीस येताच आईने थेट पिंपरी पोलीस ठाण्यात तकार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी मुलगी व तिचा मित्र निखील धुधाजी डोंगरे (वय 18 रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Talegaon Dabhade : रोटरी सिटीची काळोखे गोशाळेत पारंपारिक वसुबारस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Pimpri Gaon)यांच्यामुलीने विश्वासाने आईकडून तिचा मोबाईल घेतला. मोबाईलवरून तिच्या मित्राच्या सहाय्याने यु एन टी आय डी द्वारे आईच्या बँक खात्यावरून 50 हजार रुपये परस्पर काढून घेतले.

 

त्यानंतर त्यांनी ते पैसे मित्र तेजस तुलसानकर याच्या खात्यावर गुगल पे ने पाठवले. मात्र त्यांचा हा कारनामा उघडकीस येताच त्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात ओईनेच तक्रार दाखल केली आहे. अद्याप पोलिसांनी कोणाला अटक केली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.