Talegaon : परवानगी शिवाय झाडे तोडली व दंडाची रक्कम देखील भरली नाही म्हणून महिलेविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – नगर परिषदेच्या परवानगी शिवाय महिलेने तिच्या घराच्या परिसरातील 10 झाडे तोडल्याने (Talegaon)व त्याचा दंड ही न भरल्याने तळेगाव नगर पालिकेने महिलेची थेट पोलिसांकडे तकार केली आहे. ही झाडे महिलेने 1 ते 10 ऑगस्ट 2020 या कालावधीत तळेगाव येथील राज गुरव कॉलनी येथे तोडली आहेत.

याप्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपालिकेने महिले विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस (Talegaon)ठाण्यात तकार दिली आहे त्यानुसार पोलिसांनी नागरिक्षेत्रात झाडांचे जतन व संरक्षण कायदा 1975 व सुधारणा अधिनीयम 2021 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने तळेगाव दाभाडे नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता त्या रहात असलेल्या परिसरातील 1 नारळ, 1 आंबा, 1 डाळींब, 2 बाभूळ, 1 प्राजक्त, 3पाल्म,14 जास्वंद अशी एकूण 10 झाडे महिलेने तोडली होती. यासाठी महिलेला दंड देखील ठोठावला होता मात्र महिलेने तो दंड भरला नसल्याने पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.