Nigdi : भीमशक्ती विद्यार्थी आघाडी कमिटीच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

एमपीसी न्यूज – संत बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने व अक्षय तृतीयाचे शुभ मुहूर्त प्रसंगी (Nigdi) भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी-चिंचवड शहर कमिटीच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांना निगडी, प्राधिकरण येथे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सुरज गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सामजिक कार्यकर्ते गौतम गायकवाड, भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष परमेश्वर निसरगंध, पिंपरी चिंचवड शहर महासचिव बसवेश्वर मगी, पिंपरी चिंचवड शहर सचिव शुभम कांबळे,  पिंपरी चिंचवड शहर संघटक विशाल केंगार, पिंपरी विधानसभा अध्यक्ष अजय शेरखाने, निगडी विभागाचे अध्यक्ष लक्ष्मण कुलाली, निगडी विभागाचे उपाध्यक्ष लहू साळुंखे,  निगडी विभागाचे सचिव अमोल शीनगारे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Talegaon Dabhade : तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी एन के पाटील यांची नियुक्ती

यावेळी बोलताना भीमशक्ती विद्यार्थी आघाडीचे पुणे सुरज गायकवाड म्हणाले की बसवेश्वरांचे विचार आपल्याला नवा मार्ग दाखविण्यास समर्थ आहेत. समाज एकसंध आणि एकदिल करण्यासाठी समता, ममता आणि वैचारिक चर्चेतील खुलेपणा आपल्याला स्वीकारावा लागेल. लोकशाही केवळ शब्दांमध्ये न राहता तिला प्रत्यक्ष आकार द्यावा लागेल. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, नैतिक, भाषिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा सर्व प्रकारे होणारे शोषण थांबवावे लागेल, असे मत व्यक्त (Nigdi) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.