Talegaon Dabhade : तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी एन के पाटील यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक (Talegaon Dabhade) यांची बदली सोलापूर येथे झाली असून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी एन के पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मावळते मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची जिल्हा प्रशासन अधिकारी गट अ सोलापूर येथे सह आयुक्त पदावर बदली झाली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी (दि.21) राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे अवर सचिव अ का लक्कस यांनी दिले आहेत. एन के पाटील हे जिल्हा प्रशासन अधिकारी गट अ सोलापूर येथे सह आयुक्त पदावर कार्यरत होते.

Pune : प्रियकराच्या धमकीला घाबरुन तरुणीची लाॅजमध्ये आत्महत्या

27 एप्रिल 2022 रोजी सरनाईक हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर रूजू झाले होते.  वर्षभराच्या या काळात त्यांनी स्वच्छ, सुंदर व हरित तळेगाव करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. या कामी त्यांनी नगरपरिषदेच्या सर्व कर्मचारी वर्गाचा सहभाग घेतला होता.सरनाईक हे अत्यंत शिस्तप्रिय प्रशासन अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत स्वच्छ सर्वेक्षण अभियान,माझी वसुंधरा, नगरपरिषदेची करवसुली, कचरा डेपो, तळेगाव स्टेशन येथील तळे इत्यादी विकास कामे (Talegaon Dabhade) त्यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.