Nigdi News : वैष्णव चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट यांच्यातर्फे वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा

एमपीसी न्यूज – देहू ते पंढरपूर या दरम्यान (Nigdi News) जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट मुंबई विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत वैद्यकीय सेवा देण्यात आली. ह्या सेवेचा उपक्रम या दरवर्षी लाखो वारकऱ्यांसाठी राबवला जातो व यावेळी सुद्धा वैद्यकीय सेवांकरिता संत जलाराम चौक, निगडी प्राधिकरण येथून प्रस्थान सोहळा पार पडला.

या कार्यक्रमास माजी उपमहापौर शैलजा मोरे, पिंपरी-चिंचवड रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय प्रधान, प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स चे डॉ. राजेंद्र कांकरिया, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोरडे आदी उपस्थित होते. प्रमुख उपस्थित आणि मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिका व इतर वाहनांचे पूजन करून संपन्न झाले. याबरोबरच खरा वैष्णव या वारी विशेष अंकाचेही प्रकाशन करण्यात आले.

Pimpri Chinchwad : ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

वैष्णव चारीटेबल मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त श्रीराम नलावडे, व्यवस्थापन (Nigdi News) प्रमुख मुकेश सोमय्या, डॉ. गोरडे, प्रकाश सातव, सारंगपुरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले व याचमुळे देहू ते पंढरपूर वारी करणाऱ्या वारकर्यांना 24 तास मोफत वैद्यकीय सेवा देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.