Odisha Accident : ही राजकारण करण्याची वेळ नाही -केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

एमपीसी न्यूज- ओडिशातील रेल्वे दुर्घटनेत 288  प्रवाशांचा (Odisha Accident) मृत्यू झाला आहे. तर, 900 हून अधिक लोक जखमी आहेत.या घटनेनंतर  विरोधी पक्षांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. याला प्रत्युत्तर देत अश्विनी वैष्णव यांनी  ही राजकारण करण्याची वेळ नाही, असे म्हटले आहे.

ते म्हणाले , बचावकार्यावर आमचं लक्ष आहे. पूर्ण ताकदीने काम सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी भेट देत आवश्यक सूचना दिल्या आहे. घटनेची चौकशी करून 15 ते 20 दिवसांत तपास अहवाल सादर केला जाईल.,ही राजकारण करण्याची वेळ नाही.

Pune : टोळक्याने वैमनस्यातून कोयते उगारुन माजविली दहशत

रेल्वेच्या ‘कवच’ या यंत्रणेवरूनही विरोधी पक्षाने अश्विनी वैष्णव यांना लक्ष्य केलं. यावर रेल्वेमंत्री म्हणाले की, “ही बाब कवच यंत्रणेची नाही. तपास अहवालात सर्व काही समोर येईल. अशा प्रकारच्या अपघातात मानवी संवेदनशीलता खूप महत्वाची आहे. आमचं पहिलं काम बचावकार्याचं आहे,” असं अश्विनी वैष्णव यांनी (Odisha Accident)  सांगितलं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.