Pune : टोळक्याने वैमनस्यातून कोयते उगारुन माजविली दहशत

एमपीसी न्यूज-शिवाजीनगर भागातील (Pune ) वडारवाडी परिसरात टोळक्याने वैमनस्यातून कोयते उगारुन दहशत माजविली. टोळक्याने दुचाकी, रिक्षा आणि मोटारीची तोडफोड केली.

या प्रकरणी रवि ओरसे (वय 42, रा. जुनी वडारवाडी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पाच ते सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्य मंत्र्यांनी घेतला आढावा

ओरसे हे वडारवाडी भागातील गोलंदाज चौकात थांबले होते. त्या वेळी पाच ते सहा जण तेथे आले. त्यांच्याकडे दांडके आणि कोयते होते. टोळक्याने परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजविली.

ओरसे यांच्या मोटारीची काच फोडली. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या रिक्षा, दुचाकींची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक (Pune ) अनिल केकाण तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.