Akurdi : इंग्रजांच्या व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करावा- गायकवाड

एमपीसी न्यूज – छ. शिवाजी महाराज हे तर आपले आदर्श आहेतच, मात्र ज्या इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्या व्यवस्थापन शास्त्राचा आपण अभ्यास केला पाहिजे. कुठलीही सुविधा नसताना त्यांनी दीडशे वर्षे राज्य केले.

Chinchwad : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेजमध्ये अंतरशालेय रायफ़ल शुटिंग स्पर्धा संपन्न

भारतीय भाषा, संस्कृतीचे ज्ञान नसतानाही देशावर राज्य करणे कसे त्यांना शक्य झाले असेल यावर विचार करायला हवा. प्रसिद्ध उद्योजक भारत विकास ग्रूपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांनी दिला.

आंत्रप्रेन्यूअर्स इंटरनॅशनलच्यावतीने जेआरडी टाटा यांच्या जयंतीनिमित्ताने (आंत्रप्रेन्युअर्स दिन) आकुर्डी (Akurdi) येथील डीवायपाटील शैक्षणिक संकुलामध्ये युवा उद्योजकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी अंत्रप्रेन्युअर्स  इंटरनॅशनलचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी, अंत्रप्रेन्युअर्स क्लब बारामतीचे अध्यक्ष अनिल काळे,निगडी क्लबचे अध्यक्ष अनिल अथणीकर,पिंपरी चिंचवड क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र कुलकर्णी, तसेच आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनलचे संस्थापक बाळ पाटील, आंत्रप्रेन्युअर्सचे  इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष संतोष ललवाणी, विंग कमांडर विजय चतुर आदी उपस्थित होते.

नव उद्योजक पुरस्कार प्राप्ती मध्ये अक्षय बेल्हे,गौरव चत्तुर, दिनेश तोरडमल, श्रीप्रिया चेरेकर , कुणाल भंडारी, सिद्धार्थ साने, अस्मिता हिरवे, वरद देशपांडे, तनय ललवाणी, सागर दाणी, अभिजित खटके, सम्यक महाजन, अभिजित भावे, सागर जाधव, शुभंकर रानडे, निनाद जोशी, चिन्मय  जोशी, रोहित तुपे,  अजयराज नायर, मयूर तुपे, सचिन शंकर, योगीराज म्हसवडे या तरुण उद्योजकांचा समावेश आहे.

गायकवाड पुढे म्हणाले की,  कुठलेही कार्य करताना फक्त टारगेट न ठेवता स्वानंदासाठी, दुसऱ्यांच्या हितासाठी कार्य करा. स्पर्धा स्वतःशीच करा. काम करताना बर आहे, चांगले आहे, उत्तम आहे इतक्यावर समाधान मानू नका, तर जे कार्य कराल ते सर्वोतमच करण्याचा ध्यास घ्या.

आज आपण २४ तासात जगात कुठेही पोहोचू शकतो मात्र आम्हाला कुठे बाहेर काम करण्याची तयारी नसते, ही मानसिकता बदली पाहिजेत. जगाला एक मोठे खेडे समजून संधी शोधा.  जगात अशक्य असे काहीच नाही. रोज नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंत्रर्पेन्युअर्सचे इंटरनॅशनलचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन सागर दाणी व प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुभाष माइणकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंत्रर्पेन्युअर्स क्लबच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.