Sanskrut Shortfilm Festival: आंतरराष्ट्रीय संस्कृत लघुपट महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज : संस्कृत भारती संस्थेच्यावतीने संस्कृत भाषेतील लघुपटांचा आंतरराष्ट्रीय महोत्सव (International sanskrit short film festival) आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी स्पर्धकांनी एक ते पाच मिनिटे कालावधीचा लघुपट 30 नोव्हेंबरपर्यंत पाठवावयाचा आहे. सहभागी लघुपटांचे परीक्षण झाल्यानंतर जानेवारीमध्ये नामांकनाची घोषणा करण्यात येणार आहे. जानेवारी अखेरीस नागपूर येथे पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे.

PCMC News: विकासकामाच्या नावात बदल होणार

या महोत्सवामध्ये पहिल्या वर्षी 15 लघुपट सहभागी झाले होते. त्यानंतर 27 तर गेल्या वर्षी 29 लघुपटांचा सहभाग होता. स्पर्धेतील प्रवेशासाठी एक मिनिटापासून ते पाच मिनिटे कालावधी असलेला केवळ संस्कृत भाषेतील लघुपटांचा विचार केला जाणार आहे. स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपली निर्मिती असलेला लघुपट www.samskrutbahrati.in या संकेतस्थ‌ळावर 30 नोव्हेंबरपर्यंत पाठवावयाचे आहेत.

या महोत्सवाचे यंदा चौथे वर्ष असून महोत्सवात प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. त्याखेरीज सर्वोत्कृष्ट संहिता, दिग्दर्शन, संकलन, ध्वनीरेखन, छायालेखक, अभिनेता, अभिनेत्री, सहायक अभिनेता-अभिनेत्री, गीतकार आणि संगीतकार अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्कृत भारतीचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख शिरीष भेडसगावकर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.