Pavana Dam update :  पवना धरण पाणीसाठा 65 टक्यांवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाची ( Pavana Dam update ) संततधार सुरूच आहे.  गेल्या 24 तासात 65 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 65.19 टक्यांवर गेला आहे.

Alandi : आळंदीमध्ये डोळे लागण रुग्णांच्या संख्येत घट; कालची रुग्णसंख्या 777

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले आहे. महापालिका पवना नदीतून रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

धरणातील पाण्याची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 65 मिली मीटर

# 1 जूनपासून झालेला एकूण पाऊस –  1407 मिली मीटर

# गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस –  1572 मिली मीटर

#  धरणातील सध्याचा पाणी साठा – 65.19 टक्के

# गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 78.60 टक्के

# गेल्या 24 तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – 4.07 टक्के

# 1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – 47.29  टक्के

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.