Maval : काँग्रेस आय कमिटीचा तहसिल कार्यालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज – मावळ तालुका काँग्रेस आय कमिटीच्यावतीने ( Maval) आज (सोमवार, दि 24) तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात मावळ तालुका काँग्रेस आय पेटून उठली असून लवकरात लवकर मनीपुर मध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मोदी सरकारने प्रयत्न करावेत यासाठीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

मोर्चामध्ये मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, प्रांतिक सदस्य ॲड. दिलीप ढमाले, मावळ महिला अध्यक्ष प्रतिमा हिरे, मावळ युवक अध्यक्ष राजेश वाघुले, लोणावळा शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, प्रांतिक सचिव निखिल कवीश्वर, मावळ लीगल सेलचे अध्यक्ष,ॲड खंडू तिकोणे, तालुका प्रवक्ता मिलिंद अच्युत,तळेगाव युवक अध्यक्ष समीर दाभाडे, विशाल वाळूंज,विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष पवन गायकवाड, सेवा दल अध्यक्ष असलाम शेख,देहूरोड शहराध्यक्ष मलिक शेख आदी उपस्थित होते.

Pavana Dam update :  पवना धरण पाणीसाठा 65 टक्यांवर

मावळ तालुक्याचे अध्यक्ष यशवंत मोहोळ तसेच महिला अध्यक्षा प्रतिमा हिरे, मावळ काँग्रेसचे युवक अध्यक्ष राजेश वाघुले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा मध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रिया व अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. लवकरात लवकर मणिपूर मध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मोदी सरकारने प्रयत्न करावेत यासाठीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

अनेक पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयामध्ये झालेल्या सभेमध्ये तीव्र भावना व्यक्त केल्या. मावळ तालुक्यात केंद्र सरकार विरोधात प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून महिला व विद्यार्थिनींना संरक्षण देण्यात केंद्र सरकार अपयशी पडल्याची भावना मावळ काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात ( Maval) आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.