Alandi : आळंदीमध्ये चला जाणूया नदीला उपक्रमाअंतर्गत इंद्रायणी नदी जलप्रदूषणाबाबत बैठक

एमपीसी न्यूज –  काल (दि.24 ) आळंदीमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्त निवास येथे ‘ चला जाणूया नदीला ‘ उपक्रमात नदी यात्रा संवाद बैठक (Alandi) आयोजित करण्यात आली  होती.

Maval : काँग्रेस आय कमिटीचा तहसिल कार्यालयावर मोर्चा

इंद्रायणी नदी काठी असणाऱ्या शहरातील  व गावातील सांडपाणी थेट ते नदीपात्रात सोडले जाते. तसेच काही कंपन्या त्यांच्या केमिकल युक्त पाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीपात्रात सोडतात . यावर कश्या पद्धतीने उपाययोजना कराव्यात व राबवाव्यात,

तसेच इंद्रायणी नदीमध्ये विविध प्रकारे (प्लास्टिक, निर्माल्य,कचरा इ.) जलप्रदूषण होत असते ते रोखण्यासाठी उपाय योजना करणे, जलप्रदूषण रोखण्यासाठी जन जागृती करणे, नदी काठची व ओढा ,नाल्याची आक्रमणे रोखणे,ओढा नाल्यातील सांडपाणी शुद्ध कसे करता येईल,अशा विविध बाबींवर उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त करत त्यावर चर्चा करण्यात आली.

Maval : काँग्रेस आय कमिटीचा तहसिल कार्यालयावर मोर्चा

यावेळी नरेंद्र चुग,शिरीष कारेकर,अजित वडगावकर, अर्जुन मेदनकर, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, विठ्ठल शिंदे, डॉ.सुनिल वाघमारे,  श्रीधर कुऱ्हाडे, जनार्दन पितळे, बंडु नाना काळे, शिवाजी जाधव,एस, एन, अनासपुरे,वैभव गलबले,संजू कांबळे अनिल गावडे,चारुदत्त प्रसादे, भागवत काटकर, किरण नरके,सुरेश दौंडकर, पालिका प्रशासन कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी इंद्रायणी आरती व पसायदान म्हणण्यात (Alandi) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.