Chhath Puja: छ्ठ पूजा उत्सवासाठी पवना नदी घाट सज्ज; घाटाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

एमपीसी न्यूज –   उत्तर भारतीय बांधवांच्या दोन दिवसीय छ्ठ पूजा (Chhath Puja) उत्सवास उद्या रविवारपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने घाट परिसरात स्वच्छता, निर्माल्य व्यवस्था व इतर आवश्यक बाबी पुरवाव्यात, येणार आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चिंचवड गावातील पवना नदीवरील घाटास प्रत्यक्ष भेट देत कामांचा आढावा घेतला.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, प्रभाग अधिकारी,  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते खंडूशेठ चिंचवडे, शशिकांत श्रीवास्तव, जे जे गुप्ता, मुन्ना गुप्ता, दुर्लमप्रसाद गुप्ता, मदनरमई प्रसाद गुप्ता, मनीष लक्ष्मण गुप्ता  आदी उपस्थित होते.

Maval : कातवी गावातील भव्य रांगोळी स्पर्धेत मंदा चव्हाण पैठणीच्या मानकरी

नोकरी, उद्योग, व्यवसायानिमित्त बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश येथून आलेले नागरीक पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. हे उत्तर भारतीय बांधव दरवर्षी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात छट उत्सव साजरा करतात. चिंचवडगावातील पवना नदीच्या घाटावर हनुमान मित्र मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो. रविवारी (दि. 30) आणि सोमवारी (दि. 31) रोजी मोठ्या प्रमाणात छट उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पवना नदीच्या घाटावर भव्य गंगा आरती आणि पूजा (Chhath Puja), भजन, छट लोकगीत असे विविध धार्मिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.