Pimpri : साईस्’ ड्रोन डेव्हप्लमेंट चॅलेंजमध्ये पीसीसीओईचा संघ प्रथम 

एमपीसी न्यूज  – चैन्नई येथे झालेल्या ‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर इंडिया’ साउथर्न सेक्शन ड्रोन डेव्हलपमेंट चॅलेंज (साईस्) या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पिंपरी (Pimpri) -चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) मॅव्हरिकने विद्यार्थी संघाने प्रथम क्रमांक पटकावला. संघाला रोख रुपये एक लाख आणि सर्वोत्कृष्ट तांत्रिकी सादरीकरणासाठी रुपये दहा हजारांचे बक्षीस मिळाले.

Kothrud : वरिष्ठ पत्रकार संदीप कोर्टीकर यांचे निधन

या स्पर्धेचा मुख्य उद्देश ड्रोनच्या माध्यमातून जास्तीत जास्त वजन वाहून नेणे. संरक्षण विभागाला किंवा बचाव पथकाला आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय साहित्य वाहून नेण्यासाठी होऊ शकेल. नियुक्त केलेल्या भागात शोध आणि बचाव कार्यक्रमाचा एक भाग म्हणून वापरता येईल तसे ड्रोन विकसित करणे हा होता.

यासाठी पीसीसीओईच्या मॅव्हरिक संघाने कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ड्रोन विकसित केले. या स्पर्धेत मॅव्हरिक ड्रोनने जास्तीत जास्त वजन ३.९ किलो अपेक्षित असताना पाच किलो अतिरिक्त भार उचलून यशस्वीपणे प्रथम क्रमांक मिळवला.

संपूर्ण भारतातून या स्पर्धेसाठी ८१ अभियांत्रिकी संघ सहभागी झाले होते. जुलै महिन्यात चेन्नईच्या राजलक्ष्मी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ही स्पर्धा झाली. यांत्रिकी विभागाचे प्रा. चंदन इंगोले यांनी मॅव्हरिक संघाला मार्गदर्शन केले.

मिहीर झांबरे, अनिकेत पिंगळे, रिफा अन्सारी (कर्णधार), पार्थ देशमुख, अपूर्वा परदेशी, ओम बाजपेयी, रोहन गायकवाड, साक्षी कुडके, वैष्णवी खिलारी, ओम दुर्गे, रोहित तांबडे, सुजय अंबाडकर, प्रणाली मगदूम, खुशी ठोके, तन्मय राजपूत, तृप्ती बावनकर, वेदांत भारसाकळे, आदित्य पाटील, शर्वरी साळोख, महेश्वर ढोणे या विद्यार्थ्यांचा मेव्हरिक संघात समावेश होता.

यांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पद्माकर देशमुख, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, डॉ. नरेंद्र देवरे यांचे मार्गदर्शन लाभले तर, या यशाबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थी आणि सहभागी शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.