Kothrud : वरिष्ठ पत्रकार संदीप कोर्टीकर यांचे निधन

एमपीसी न्यूज –  वरिष्ठ पत्रकार संदीप अशोक कोर्टीकर, वय 50, रा. सहवास सोसायटी, कोथरूड (Kothrud) (मूळ रा. पंढरपूर) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री निधन झाले.

NCP : संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा – अजित गव्हाणे

त्यांच्यावर मंगळवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी वंदना, मुलगी नेहा, मुलगा अथर्व असा परिवार आहे.

त्यांनी केसरी, लोकसत्ता, सकाळ, टाइम्स ग्रुप, लोकमत अशा प्रतिष्ठीत वृत्तपत्रात अनेक वर्षे पत्रकारिता केली. मनमिळावू आणि इतरांना मदत करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अनेक पत्रकारानाही घडवले आहे. सध्या ते मुक्त पत्रकार व माध्यम समन्वयक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्राची हानी झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.