NCP : संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज –  प्रगत आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात संभाजी भिडे यांच्यासारखे लोक थोर महात्म्यांबद्दल अवमानकारक टिप्पनी करून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाच आठवड्यात महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडे यांचा बोलाविता धनी कोण आहे ते शोधून काढून त्यांना तात्काळ अटक करावी,  अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.

Pune : पुणे येथे महसूल सप्ताहाचा राज्यस्तरीय शुभारंभ

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक समाजसुधारकांच्या बाबतीत केलेल्या अवमानकारक वक्तव्यांचा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करून भिडे यांचा तीव्र निषेध करण्यात आला.

माजी नगरसेवक राहुल भोसले, शाम लांडे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, सतीश दरेकर, संगीताताई ताम्हणे, कार्याध्यक्ष फजल शेख, युवतीच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांच्यासह कविता खराडे, विजय लोखंडे, गोरक्ष लोखंडे, संजय औसरमल, विशाल काळभोर, अकबर मुल्ला, सचिन औटे, गंगा धेंडे, पुष्पा शेळके, मनीषा गटकळ, ज्योती गोफणे, युवराज पवार.

तसेच, किरण देशमुख, बाळासाहेब पिल्लेवार, प्रसाद कोलते, संतोष निसर्गंध, अक्षय माछरे, संगीता कोकणे, मीरा कदम, विजय दळवी, सुनिता अडसुळे, अरुणा कुंभार, सविता धुमाळ, ज्योती तापकीर, उज्वला ढोरे, आशा शिंदे, नीलम कदम, दिपाली देशमुख, इमरान शेख, रवींद्र सोनवणे, राजू चांदणे, अश्विनी जाधव, महेश माने, प्रवीण पिंजन, जया गवळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गव्हाणे म्हणाले, संभाजी भिडे यांना राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्ये करण्याची खोड आहे. ही वक्तव्ये जाणिवपूर्वक केली जात असून या माध्यमातून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा आहे.

या राज्यात संभाजी भिडे यांच्यासारख्या अपप्रवृत्तींना थारा देता कामा नये. ते समाज भरकटविण्याचा प्रयत्न करत आहेत. भिडे यांच्यावर कारवाई करण्यास विलंब होत असून त्यांचा बोलविता धनी कोण आहे? ते देखील शोधून काढले पाहिजे. सातत्याने समाजसुधारकांचा अवमान करणाऱ्या भिडे यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही गव्हाणे यांनी यावेळी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.