Pimpri : तरूणांनी फुले दाम्पत्याचा आदर्श ठेवून वाटचाल करावी – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान (  Pimpri) अनमोल आहे. महात्मा फुले आणि समता हे शब्द जणू हातात हात घालून येतात. महिलांनाही पुरुषांइतकाच शिक्षणाचा अधिकार आहे असे केवळ महात्मा ज्योतिबा फुले बोलून थांबले नाहीत. तर, प्रत्यक्षात तसा अधिकार महिलांना मिळावा म्हणून त्यांनी आयुष्य वेचले. स्वत:च्या पत्नीपासून त्यांनी याची सुरुवात केली व पुढे महिलांसाठी शिक्षणाचा राजमार्ग खुला करून दिला. त्यांचे विचार भविष्यात प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देत राहतील असे मत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केले.  आजच्या तरूण पिढीने फुले दाम्पत्यांचा आदर्श ठेवून भविष्याची वाटचाल करावी, असेही ते म्हणाले.

Shiroli Khurd : बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलीचा मृत्यू

 

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंत्तीनिमित्त पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील क्रांतिसूर्य फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच खराळवाडी येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयातील फुले यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष गव्हाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गव्हाणे बोलत होते. याप्रसंगी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल, ॲड.गोरक्ष लोखंडे, ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे, महिला कार्याध्यक्षा कविता खराडे, ज्योती गोफणे, ज्ञानेश्वर कांबळे, कुमार कांबळे, राजू चांदणे,यश बोथ, निखिल घाडगे, मीरा कांबळे,  ॲड. विद्या शिंदे, रजनी गोसावी, प्रदीप गायकवाड, संजय बनसोडे, धनाजी तांबे, सुनील अडागळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महात्मा फुले यांचे सामाजिक विचार अत्यंत प्रखर होते. बालविवाह व विधवांच्या शोषणाविरोधात त्यांनी आवाज उठवला. सामाजिक समता प्रस्थापित व्हावी म्हणून ते सतत झटत राहिले.  महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना स्वत:च्या विचारांसाठी तत्कालीन परंपरावाद्यांकडून शेणाचा माराही सहन करावा लागला. मात्र ते बधले  नाहीत. आजच्या तरूण पिढीने फुले दाम्पत्यांचा आदर्श ठेवून भविष्याची वाटचाल करावी, असेही ते (  Pimpri) म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.