Shiroli Khurd : बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – जुत्रर तालुक्यातील शिरोली खुर्द येथील संपत मोरे यांच्या शेतावर मुक्कामी ( Shiroli Khurd) असलेल्‌या धनगराच्या वाड्यावरील दीड वर्षांची चिमुरडीचा  बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.  ही घटना आज (  गुरुवार दि. 11 ) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.  संस्कृती संजय कोळेकर असे मृत मुलीचे नाव  आहे .

PCMC : प्रबोधन पर्वाच्या तयारीचा आढावा

संपत मोरे यांच्या शेतावर संजय कोळेकर या धनगरचा वाडा मुक्कामी होता. रात्री जेवण झाल्‌यावर सगळे कुटुंब त्याच शेतात झोपले होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आईच्या शेजारी गोधडीत झोपी गेलेल्‌या संस्कृतीला बिबट्याने अलगद उचलून बाजूच्या अर्धा किलोमिटर अंतरावरील उसाच्या शेतात फरफटत नेले व ठार केले. दरम्यान सकाळी एका उसाच्या शेतात त्या चिमुरडीचा बिबट्याने खाल्लेला  अर्धवट मृतदेह सापडला.

घटनेची माहिती कळताच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले जाणार आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वन विभाग व शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात ( Shiroli Khurd) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.