PCMC : प्रबोधन पर्वाच्या तयारीचा आढावा

एमपीसी न्यूज – क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर ( PCMC) यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने आजपासून 15 एप्रिल 2024 दरम्यान पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या अनुषंगाने विचार प्रबोधन पर्वाचे संयोजक तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह तयारीच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी स्मारकाशेजारील मैदानात क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. महानाट्य, लाईव्ह कॉन्सर्ट, गीत गायन, पोवाडे, कव्वाली, एकपात्री नाट्यप्रयोग, मतदान जनजागृती अशा विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये स्थानिक तसेच दिग्गज कलावंतांचा समावेश असणार आहे. प्रबोधन पर्व तसेच जयंतीच्या काळात महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांमध्ये कोणतीही कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Talegaon Dabhade :रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा.लिमिटेडने चिमुकल्याच्या शस्त्रक्रियेसाठी केली अडीच लाखांची मदत

त्यामुळे सर्व संबंधित विभाग तयारीला लागले आहेत. अतिरिक्त आयुक्त तथा प्रबोधन पर्वाचे मुख्य संयोजक उल्हास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन पर्वाची जय्यत तयारी सुरु आहे. महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा आणि पाहणी  संयोजक तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केली.  यावेळी प्रबोधन पर्वाचे संयोजक तथा उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता राजेंद्र जावळे, विनय ओहोळ, विशेष अधिकारी किरण गायकवाड यासह उद्यान, आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, सर्व कार्यक्रम उत्तम पद्धतीने आणि नियोजनबद्ध  पार पडावेत यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व आवश्यक व्यवस्था करण्याबाबतचे सबंधित विभागास आदेश देण्यात आले आहेत. विचार प्रबोधन पर्व मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. पिंपरी, एचए कॉलनी, आणि दापोडी येथील पुतळा परिसरात आवश्यक विद्युत रोषणाई तसेच पुतळा रंगरंगोटी, सुशोभिकरण करण्यात आले आहे.

क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाच्या  पाच दिवसीय कार्यक्रमांना तसेच  पिंपरी येथील एच.ए. मैदानावर दि. 15 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेले मूकनायक हे  महानाट्य पाहण्याकरीता नागरिकांची संभाव्य गर्दी विचारात घेता या ठिकाणी महापालिकेने सर्व आवश्यक तयारी सुरु केली आहे, असे   संयोजक डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले. महानाट्य पुर्णपणे मोफत असून या महानाट्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. तरी प्रबोधन पर्वातील सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले ( PCMC) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.