Talegaon Dabhade :रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा.लिमिटेडने चिमुकल्याच्या शस्त्रक्रियेसाठी केली अडीच लाखांची मदत

एमपीसी न्यूज – एका 18 महिन्याच्या लहान मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या ( Talegaon Dabhade) माध्यमातून फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा.लिमिटेड यांनी सीएसआर अंतर्गत अडीच लाखांची मदत केली. रोटरी कडून संबंधित रुग्णालयाला रूपय अडीच लाखांचा धनादेश वर्ग करण्यात आला आहे.

 

फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, चाकन, येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात रोटरीचे अध्यक्ष उद्धव चितळे यांच्याकडे 2.5 लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी फ्लॅशचे बिझनेस युनिट हेड श्री. रवींद्र चव्हाण, फॉर्जिंग विभागाचे प्लांट हेड ए गुरुमुर्ती, मशिनिंग विभागाचे प्लांट हेड धर्मेंद्र जैन, फायनान्स कंट्रोलर शैलेश जाधव, संध्या यादव, स्वाती अल्हाट, प्रमोद पाटील, राजाराम पवार, गजानन डफे, रोटरी क्लब तळेगाव दाभाडेचे उपाध्यक्ष कमलेश कार्ले, माजी अध्यक्ष अशोक काळोखे, सचिव श्री शैल मेन्थे, खजिनदार प्रमोद दाभाडे व इतर उपस्थित ( Talegaon Dabhade)  होते.

Chinchwad : उद्योजक हे भारताचे भाग्यविधाते –  गिरीश प्रभुणे

 

सदर निधी हा जेथे या चिमुकल्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्या मद्रास ई एन टी फाउंडेशन हॉस्पिटलच्या बँक खात्यात रोटरी तर्फे वर्ग करण्यात आली ह्या शस्त्रक्रियेचा एकूण खर्च २२.५० लाख रूपये इतका असून त्या पैकी 2.5 लाख रुपये फ्लॅश कंपनीने दिले ( Talegaon Dabhade)  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.