Pune : बिबट्याचा हल्ला शेतकरी पुत्रांनी परतून लावला; पुणे जिल्ह्यातील थरारक घटना

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड (Pune) आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. या परिसरात बिबट्याचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचे यापूर्वी अनेकदा उघडकीस आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात काही माणसांना तर कित्येक जनावरांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यानंतर शिरूर तालुक्यातून एक अशीच घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये दोन शेतकरी पुत्रांनी बिबट्या सोबत दोन हात करत त्याचा हल्ला परतून लावला. ही घटना मंगळवारी घडली आहे.

शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील असलेले विकास रतन जाधव आणि वैभव मोहन जाधव हे दोन तरुण मंगळवारी शेतात काम करत होते. यावेळी मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने विकास जाधव या तरुणावर हल्ला चढवला. या हल्ल्याने विकास काही क्षण गडबडून गेला. मात्र शेजारीच काम करत असणाऱ्या वैभव जाधव या तरुणाने प्रसंगावधान दाखवत जवळच पडलेल्या काठीने बिबट्याला मारण्यास सुरुवात केली. यानंतर मात्र बिबट्याने वैभव जाधव या तरुणावर हल्ला चढवला. पंजाने त्याच्या पाठीवर वार करत त्याच्या मानेवर चावा घेण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. मात्र वैभवने आपली सुटका करून घेतली आणि त्यानंतर बिबट्याने पुन्हा आपला मोर्चा विकास या तरुणाकडे वळवला. मात्र शेवटी अखेर झालेल्या झटापटीत बिबट्याला (Pune) माघार घ्यावी लागली आणि तो पळून गेला.

PMC News : पुणे महानगरपालिका नागरिकांसाठी झाली अपडेट; विविध सेवांसाठी खास व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू

दरम्यान दिवसाढवळ्या अशा प्रकारे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माणसांवर प्राण घातक हल्ला करणाऱ्या या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.