Pune Crime : पत्नीला नवीन घर घेऊन देण्यासाठी त्याने केली धाडसी चोरी, आता मात्र गजाआड

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा परिसरात काही (Pune Crime) दिवसांपूर्वी जबरी चोरीचा एक प्रकार उघडकीस आला होता. ख्रिसमस साजरा करण्यासाठी गेल्याने एका घरात तब्बल 37 लाख रुपयांची चोरी झाली होती. खिडकीला लावलेले ग्रील तोडून आरोपीने घरात प्रवेश करत ही चोरी केली होती. सोन्या चांदीचे दागिने आणि डायमंड नेकलेस आरोपीने चोरून नेले होते. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी बबीता डिसूजा यांनी तक्रार दिली होती. या चोरीचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. त्यांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे.

मलाप्पा होसमानी (वय 31) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच युनिट 5 कडे या घटनेचा तपास दिल्यानंतर त्यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक संशयित व्यक्ती घराच्या भागात वावरत असताना आढळून आले. या व्यक्तीच्या गाडी नंबर वरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले

चौकशी दरम्यान मलाप्पाने हे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचे कारण दिल्यानंतर पोलीस देखील बुचकळ्यात पडले. प्रेम विवाह झाल्यामुळे घरचे फारसं लक्ष देत नव्हते आणि त्यांच्यात अनेक वेळा वाद झाले. प्रेम विवाह केल्यामुळे घरच्यांनी घरातून हाकलून दिले होते मात्र पत्नीसाठी नवीन घर घेता यावं आणि तिथे एकत्र राहता यावं यासाठी त्याने घरफोडी करण्याचा प्लॅन बनवला. आरोपीकडून (Pune Crime) सोन्याचे व हिऱ्याचे दागिने असा 37 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.