Pune Mahavitaran : पुणे प्रादेशिक विभागात 2.55 कोटी रुपयांच्या 771 वीज चोऱ्या पकडल्या

एमपीसी न्यूज : डिसेंबरमध्ये महावितरण पुणे प्रादेशिक (Pune Mahavitaran) विभागात वीज चोरीची 771 प्रकरणे व अनधिकृत वीज वापराची 238 प्रकरणे उघडकीस आलेली आहे. मागील महिन्यात वीज चोरीविरुद्ध कडक मोहीम राबविण्यात आलेली असून 7404 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यात 2 कोटी 55 लाख रुपयांची एकूण 771 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली तर 81 लाख 23 हजार रुपयांची 238 अनधिकृत वीज वापराची प्रकरणे उघडकीस आलेली आहे. यात एकूण 417 प्रकरणात 149 लाख रुपये वसूल करण्यात आलेले आहेत.

 

पुणे परिमंडळात एकूण दोन हजार 962 वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची 144 प्रकरणे व वीज चोरीची 272 प्रकरणे उघडकीस आलेली आहे. बारामती परिमंडळात एकूण दोन हजार 361 वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची 53 प्रकरणे व वीज चोरीची 359 प्रकरणे उघडकीस आलेली आहे.

 

कोल्हापूर परिमंडळात एकूण दोन हजार 81 वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची 41 प्रकरणे व वीज चोरीची 140 प्रकरणे उघडकीस आलेली आहे.

Pune Crime : पत्नीला नवीन घर घेऊन देण्यासाठी त्याने केली धाडसी चोरी, आता मात्र गजाआड

वीज चोरीविरुद्ध मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश पुणे (Pune Mahavitaran) प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 व 136 नुसार वीज चोरी हा दंडनीय अपराध असून यात आरोपींना 3 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरीपासून परावृत्त व्हावे, असे महावितरणने आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.