PCMC : कामावर नसलेल्या कर्मचा-यांच्या नावाने काढले 16 लाखांचे मानधन, लिपिक निलंबित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयातील (PCMC)  लिपिकाने पालिका सेवेत कार्यरत नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावे मानधनाची 16 लाख रुपयांची बीले काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  लिपिकाला पालिका सेवेतून निलंबित केले असून विभागीय चौकशी करण्याचा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे.

Hadapasar : तीन कर्मचाऱ्यांना चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुबाडले

दत्तात्रेय विठ्ठल पारधी असे निलंबित केलेल्या लिपिकाचे नाव आहे. महापालिका वैद्यकीय विभागांतर्गत जिजामाता रुग्णालयात ते कार्यरत होते. रुग्णालयात कार्यरत गट ‘अ’ व ‘ड’ वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कामकाज, मानधनावरील कर्मचाऱ्यांचे मासिक बिल, सार्वजनिक सुट्यांचे बिल अशी जबाबदारी पारधी यांच्याकडे होती.

 

रुग्णालयाच्या जुलै 2020 च्या मानधन बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्या लक्षात आले. त्याबाबतची चौकशी करण्यात आली.त्यात पारधी यांनी कार्यरत नसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावे मानधनाची बिले काढल्याचे आढळले. मानधनाचे बील तयार करताना अधिकारी, कर्मचारी यांच्या संख्येत तफावत आहे.

 

महापालिकेत कार्यरत नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने बीले काढली आहेत. सप्टेंबर 2020 ते मार्च 2023 या कालावधीत बोगस बिले काढून 16 लाख 10 हजार 929 रुपयांचा अपहार केला असून पालिकेची आर्थिक फसवणूक केली आहे. पारधी यांनी 16 लाखांचा अपहार केल्याचे लेखी स्वरूपात मान्य (PCMC)  केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.