Pune : मी खडकवासला मतदार संघामधून अगोदरच पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे – रुपाली चाकणकर 

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेतील हिरकणी कक्षाला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Pune ) यांनी भेट दिली.त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी  संवाद साधला.त्यावेळी रुपाली चाकणकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही भाजपमधून खडकवासला मतदार संघातून लढणार असल्याची चर्चा असल्याचे विचारण्यात आले.

 

PCMC : कामावर नसलेल्या कर्मचा-यांच्या नावाने काढले 16 लाखांचे मानधन, लिपिक निलंबित

 

त्याबाबत रुपाली चाकणकर  त्या म्हणाल्या की,मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये अनेक पदावर काम केलं आहे.तसेच ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की, मी दुसऱ्या पक्षातून इच्छुक आहे त्यांची आणि माझी एकदा मला भेट घालून द्या,या गोष्टी तुमच्याकडूनच मला समजतात.

 

शरद पवार यांनी सर्व सामान्य कुटुंबातील एका महिलेला राज्य महिला आयोगावर काम करण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल पवार साहेबाची मी आभारी असून मी खडकवासला मतदार संघामधून अगोदरच पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याची भूमिका मांडत इतर चर्चांना त्यांनी पूर्णविराम यावेळी ( Pune ) दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.